अतिवृष्टी नुकसान भरपाई : सरकारची मदत मिळणार जून ते सप्टेंबर २०२४ या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली. अखेर मंगळवारी (२५ तारखेला) राज्य सरकारने या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाअंतर्गत नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील २३,०६५ शेतकऱ्यांसाठी एकूण २९ कोटी २५ लाख ६१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सरकारने यासंबंधी अधिकृत निर्णय जाहीर केला आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळेल?
फक्त अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे. २ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ४७,००० रुपये मदत मिळेल. मात्र, कोणत्याही शेतकऱ्याला ५,००० रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळणार नाही.
शेतकऱ्यांच्या अडचणी
शेतकरी सांगतात की, अनेकदा त्यांच्या झालेल्या नुकसानीची नोंद चुकीची केली जाते, त्यामुळे त्यांना योग्य ती मदत मिळत नाही. काही शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा कमी रक्कम दिली जाते. त्यामुळे अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित राहतात.
मदतीसाठी पात्र जिल्हे
या योजनेअंतर्गत चार विभागांतील १९ जिल्ह्यांना मदत दिली जाणार आहे.
नाशिक विभाग – जळगाव
पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
नागपूर विभाग – गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर
अमरावती विभाग – अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम
छत्रपती संभाजीनगर विभाग – परभणी, लातूर, हिंगोली, धाराशीव, नांदेड
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आणि आपल्या नावाची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन जिल्हानिहाय यादी तपासू शकतात.