महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार या दिवशी!

महिलांना दरमहा ₹1500 मदत महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा लाभ सात महिन्यांपासून महिलांना मिळत आहे. सरकारने जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंतचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल, याची सर्वांना उत्सुकता आहे.

सात महिन्यांत मिळाले ₹10,500

जुलै 2024 पासून जानेवारी 2025 पर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात एकूण ₹10,500 जमा झाले आहेत. ही रक्कम महिलांच्या दैनंदिन खर्चासाठी उपयोगी ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक हप्ता वेळेवर मिळावा, अशी महिलांची अपेक्षा आहे.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल?

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 20 फेब्रुवारीपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये केवळ 28 दिवस असल्याने, निधी लवकर हस्तांतरित केला जाईल, असा अंदाज आहे.

महिलांना दिलासा

या योजनेचे आतापर्यंतचे सर्व हप्ते वेळेवर जमा झाल्यामुळे महिलांना आता फेब्रुवारीच्या हप्त्याचाही विश्वास आहे. शासनाच्या नियोजनानुसार, 20 फेब्रुवारीपर्यंत हप्ता खात्यात येईल, त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment